Advertisement

गोरेगाव मेट्रो स्टेशनला राम मंदिर रेल्वे स्टेशनशी फूटब्रिजद्वारे जोडणार

या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

गोरेगाव मेट्रो स्टेशनला राम मंदिर रेल्वे स्टेशनशी फूटब्रिजद्वारे जोडणार
SHARES

'दहिसर-गुंदवली मेट्रो 7' मार्गावरील गोरेगाव पूर्व मेट्रो स्थानक राम मंदिर रेल्वे स्थानकाशी फूटब्रिजद्वारे जोडले जाईल. गोरेगाव मेट्रो स्टेशन ते राम मंदिर रेल्वे स्टेशन दरम्यान फूटब्रिज बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्थानकांना रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 'मेट्रो 7' मार्गावरील गोरेगाव मेट्रो स्टेशन आणि राम मंदिर रेल्वे स्थानक फूटब्रिजने जोडले जाणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑक्टोबर 2022 मध्ये या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी तीन निविदा सादर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा अंतिम करून मंजूर करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे.

मे नीरज स्ट्रक्चरल्स लिमिटेड आणि मे. फोर्स कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जॉइंट व्हेंचर) ची ब्रिजच्या बांधकामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 210 कोटी रुपये खर्चून हा फूटब्रिज बांधण्यात येणार आहे. निविदा अंतिम झाल्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पूल खुला झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.



हेही वाचा

मंगळवारपासून एसी डबलडेकर बस 'या' मार्गावर धावणार, तिकिटाचे दर जाणून घ्या

मध्य रेल्वेच्या १२ आणि १५ डब्यांच्या लोकलच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा