Advertisement

मंगळवारपासून एसी डबलडेकर बस 'या' मार्गावर धावणार, तिकिटाचे दर जाणून घ्या

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

मंगळवारपासून एसी डबलडेकर बस 'या' मार्गावर धावणार, तिकिटाचे दर जाणून घ्या
SHARES

गारेगार प्रवास घडवणारी पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus)  मुंबईत (मुंबई) मंगळवारपासून (21 फेब्रुवारी) धावणार आहे. सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान ही बस सेवा सुरू होत आहे. (electric Double decker Ac bus ticket price)

प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या (BEST) ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली आहे.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सीट बेल्ट, स्पीकर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत.

आसनक्षमतेबद्दल बोललो तर एका वेळी 65 लोक बसून प्रवास करु शकतात. तर 15 ते 20 लोक उभे राहून प्रवास करु शकतात. मार्च अखेरीस 50 डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

सध्या, बेस्टच्या ताफ्यात 45 नॉन-एसी डबल डेकर आहेत जे डिझेलवर चालतात आणि ते जूनच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने बंद होतील. बेस्टकडून भाडेतत्त्वावर ई-डबल डेकर बस खरेदी केल्या जात आहेत. 2022 मध्ये एक बस सुरू करण्यात आली आणि मुंबईसाठी अशा एकूण 900 बसेस आणण्याची योजना आहे.

पूर्वीच्या डबल डेकर बस नॉन-एसी होत्या. परंतु नवीन बस उत्तम एसी, सस्पेन्शनसह आरामदायी आणि आवाजविरहीत असतील. यामुळे बस स्टॉपवरील प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि प्रत्येक ट्रिपमध्ये अधिकाधिक ऑफिस-जाणाऱ्यांची वाहतूक होईल, एका ई-डबल डेकर बसमध्ये 90 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. यातून प्रवास केल्यास रस्त्यावरील 20 खाजगी वाहनांची संख्या कमी होऊ शकते. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे लोकल ट्रेनच्या वेळेत बदल?

मध्य रेल्वेच्या १२ आणि १५ डब्यांच्या लोकलच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा