Advertisement

पोलिसांनो, 'मस्त खा स्वस्थ रहा', ६ वर्षांनंतर आहार भत्त्यात वाढ


पोलिसांनो, 'मस्त खा स्वस्थ रहा', ६ वर्षांनंतर आहार भत्त्यात वाढ
SHARES

राज्यभरातील पोलिसांना राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. पोलिसांच्या आहार भत्यात सरकारने शुक्रवारी मोठी वाढ केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता पोलिसांना महिन्याला १३५० ते १५०० रुपये इतका आहार भत्ता मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजं तब्बल ६ वर्षांनंतर पोलिसांच्या आहार भत्यात वाढ झाली आहे.


सद्यस्थितीत 'इतका' भत्ता

सध्या पोलिसांना महिन्याला ७०० रुपये इतका आहार भत्ता मिळतो. हा भत्ता कमी असल्याने आहार भत्ता वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीप्रमाणे आहार भत्त्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवत राज्यभरातील पोलिसांना दिसाला दिला आहे.


कशी आहे वाढ?

या प्रस्तावानुसार पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि छायाचित्रकार यांच्यासह पोलीस काॅन्स्टेबल आणि पोलीस नाईक अशा सर्वच वर्गातील पोलिसांच्या आहार भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि छायाचित्रकारांचा आहार भत्ता सध्या ८४० रुपये महिना असा आहे. यापुढे त्यात दुपटीने वाढ होऊन त्यांना महिन्याला १५०० रुपये भत्ता मिळणार आहे.

तर, पोलीस काॅन्स्टेबल आणि पोलीस नाईक यांचा भत्तात सध्या ७०० रुपये इतका आहे. आता त्यांना १३५० रुपये इतका आहार भत्ता मिळणार आहे.



हेही वाचा-

वर्ल्ड सँडविच डे - 'ही' भन्नाट सँडविचेस एकदा तरी खायलाच हवीत!

इटालियन पिझ्झाचा आस्वाद घ्यायचा आहे? मग भेट द्या '1441 पिझेरीयाला'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा