Advertisement

वर्ल्ड सँडविच डे - 'ही' भन्नाट सँडविचेस एकदा तरी खायलाच हवीत!

मुंबईकरांसाठी सँडविच ही संकल्पना काही नवीन नाही. सकाळ-संध्याकाळ पोटोबा करण्यासाठी किंवा कधी तरी रोजच्या जेवणाचा कंटाळा आला की आपण सँडविचवर ताव मारतो. पण नेहमीची सँडविच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर ही भन्नाट सँडविचेस तुम्ही ट्राय करायलाच हवीत!

वर्ल्ड सँडविच डे - 'ही' भन्नाट सँडविचेस एकदा तरी खायलाच हवीत!
SHARES

मुंबईकरांसाठी सँडविच ही संकल्पना काही नवीन नाही. सकाळ-संध्याकाळ पोटोबा करण्यासाठी किंवा कधी तरी रोजच्या जेवणाचा कंटाळा आला की आपण सँडविचवर ताव मारतो. सँडविच तसं पचायला हलकं आणि त्यात असणाऱ्या भाज्या यामुळे आरोग्यासाठीही लाभदायी आहे. त्यामुळे एका सँडविचमध्ये पुरेसं पोट भरतं.


via GIPHY


वेज टोस्ट, मसाला टोस्ट, चीझ टोस्ट असे सँडविचचे अनेक प्रकार आहेत. पण हे प्रकार खाऊन तुम्हाला बोअर झालंय? मग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हटके आणि खिश्याला परवडणारे सँडविच. कधी तरी तुम्हे हे सँडविचेस देखील ट्राय करू शकता.


शेव पुरी सँडविच

स्नॅक म्हणून शेवपुरी आपण खातोच. चवीला तिखट आणि आंबट अशी ही शेवपुरी मुंबईकरांच्या पसंतीची. आता हीच शेवपुरी तुम्हाला सँडविचच्या रूपात खायला मिळाली तर? झालात ना अचंबित? शेवपुरी सँडविच? कधी ऐकलंही नसेल तुम्ही. पण माटुंग्यातल्या गुप्ता चाट सेंटरमध्ये तुम्ही शेवपुरी सँडविचचा आस्वाद घेऊ शकता.


सौजन्य


या सँडविचसाठी दोन ब्रेडच्या मध्ये सहा शेवपुऱ्या ठेवलेल्या असतात. ब्रेडच्या एका बाजूला बटर लावला जातो. त्यानंतर तिखट चटणी आणि गोड चटणी लावली जाते. त्यावर थोडी पापडी टाकली जाते. मग शेवपुरीवर टाकतात तसंच कांदा, टॉमेटो आणि शेव टाकली जाते. मग त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवला जातो आणि त्यावर चीझ टाकले जाते.

कुठे - गुप्ता चाट सेंटर, माटुंगा


ढोकळा सँडविच 

ढोकळा हे गुजराती स्नॅक्स जरी असले तरी मुंबईकर ते चवीनं खातात. याचीच एक पुढची स्टेप म्हणजे ढोकळा सँडविच!


सौजन्य

यामध्ये तीन लेअर असतात. खालच्या लेअरमध्ये रवा ढोकला असतो. रवा ढोकल्याच्या वर ग्रीन चटणी लावलेली असते. यावर खमण ढोकळ्याचा लेअर ठेवला जातो. अशा प्रकारे ढोकळा सँडविचचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

कुठे - जितुभाई ढोकलावाला, कांदिवली


पिझ्झा सँडविच

पिझ्झा खायला कुणाला नाही आवडत? लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पिझ्झाचे चाहते आहेत. आता पिझ्झाची चव तुम्ही सँडविचच्या रूपात देखील चाखू शकता.



सँडविचचा हा प्रकार दिसायला पिझ्झासारखाच आहे. ब्रेडमध्ये वेजिटेबल्स आणि लिक्विड चीज आणि ब्रेडच्या वर देखील चीज टाकले जाते. त्यामुळे चीजप्रेमींसाठी तर हे सँडविच पर्वणीच आहे! चीज ब्लास्ट पिझ्झा सँडविच खायचे असेल, तर कांदिवलीच्या 'अक्कड बक्कड बॉम्बे बो' ला नक्की भेट द्या!

कुठे - अक्कड बक्कड बॉम्बे बो, कमला नगर, कांदिवली


मॅगी सँडविच

मॅगी तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. मॅगी आणि सँडविच कॉम्बिनेशन जरा हटकेच आहे.


सौजन्य

मॅगी सँडविच हा इथला आवडता पदार्थ आहे. दोन ब्रेडमध्ये मॅगी फिल केलेली असते. मॅगी प्रेमींनी एकदा तरी पवईच्या 'हंगरी हेड'ला भेट द्याच!

कुठे - हंगरी हेड, पवई


आईस्क्रिम सँडविच

आय स्क्रीम, यू स्क्रीम, वि ऑल स्क्रीम फॉर आईस्क्रिम. हे सँडविच खास करून आईस्क्रीम प्रेमींसाठी आहे! नक्कीच आईस्क्रिम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.



सर्वांच्या आवडीचे आईस्क्रिम आता सँडविचच्या रूपात उपलब्ध आहे. या सँडविचमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रिम असते. त्यात चॉकलेटचे तुकडे देखील असतात. आईस्क्रीम सँडविचचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला थेट 'सुभाष सँडविच' गाठावं लागेल.

कुठे - सुभाष सँडविच, माटुंगा



हेही वाचा

इटालियन पिझ्झाचा आस्वाद घ्यायचा आहे? मग भेट द्या '1441 पिझेरीयाला'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा