Advertisement

महाराष्ट्र पोलिस सतर्क, उचललं 'हे' पाऊल

महाराष्ट्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पावले उचलली आहेत.

महाराष्ट्र पोलिस सतर्क, उचललं 'हे' पाऊल
(Representational Image)
SHARES

आगामी अनेक धार्मिक सणांच्या दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात मार्च काढण्यास सांगण्यात आले आहे.

बुधवार, १३ एप्रिल रोजी, महाराष्ट्राचे कायदा व सुव्यवस्थेचे विशेष महानिरीक्षक सुहास वारके यांनी एक प्रेस निवेदन जारी केलं की, जातीय तेढ भडकावणाऱ्यांवर पोलिस विभाग कठोर कारवाई करेल.

लोक सण साजरे करत असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोन लाखांहून अधिक जवान तसंच ३८,००० होमगार्ड तैनात केले आहेत. राखीव पोलीस दल (SRPF) सतर्क राहावे आणि जातीय सलोखा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलावीत.

पोलीस ठाण्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील असामाजिक घटक आणि गैरकृत्यांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे जे या कार्यक्रमांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. ते कोणत्याही उपद्रव किंवा हिंसक कृत्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू करण्यासही त्यांना सांगण्यात आलं आहे.

या व्यतिरिक्त, पोलिसांना मोहल्ला कमिटी आणि धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शांतता गटांसोबत बैठका घेण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून त्यांना या कार्यक्रमांदरम्यान शांतता राखण्यासाठी आवाहन करावे लागेल. सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही त्यांना सांगण्यात येईल.

नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सोशल मीडियावरील अफवांची पोलिसांना तत्काळ माहिती देण्याची जबाबदारीही या गटांना देण्यात आली आहे. पोलिसांच्या सोशल मीडिया लॅब प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन करतील आणि प्रत्येक जिल्ह्याच्या विशेष शाखा आणि शहर पोलिसांना इंटेल इनपुट गोळा करण्यास सांगितले आहे.



हेही वाचा

बेस्टच्या ताफ्यात लक्झरी बसेसचा समावेश, मर्सिडीज, व्होल्वोच्या नावांची चर्चा

परळमधल्या 'या' पूलाची पुनर्बांधणी करण्याची पालिकेची योजना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा