Advertisement

दिलासादायक! राज्यात कोरोना मृतांच्या संख्येत विक्रमी घट

राज्यात मंगळवारी ५ हजार ४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ३० कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिलासादायक! राज्यात कोरोना मृतांच्या संख्येत विक्रमी घट
SHARES

राज्यात मंगळवारी ५ हजार ४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ३० कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात कोरोनाचे आकडे वेगानं खाली येत होते. मात्र, दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यानं आरोग्य प्रशासनापुढं मोठं आव्हान उभे राहिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनानंही कंबर कसली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळं राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७ लाख ८९ हजार ८०० झाली आहेत.

राज्यात कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ४ हजार ०८६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ५८ हजार ८७९ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ६९ टक्के इतका झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ३० रुग्ण कोरोनामुळं दगावले आहेत, त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के आहे.

सध्या ८३ हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध राज्यांत उपचार घेत आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०३ लाख ६६ हजार ५७९ चाचण्यांपैकी एकूण १७ लाख ८९ हजार ८०० चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ६ हजार २२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा