महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा एतेहाद, जेट एअरवेजबरोबर सामंजस्य करार

Mumbai
महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा एतेहाद, जेट एअरवेजबरोबर सामंजस्य करार
महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा एतेहाद, जेट एअरवेजबरोबर सामंजस्य करार
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबई  -  

राज्यात पर्यटनाला चालना मिळावी तसेच विमान कंपन्यांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन मंडळाने एतिहाद आणि जेट एअरवेजबरोबर सामंजस्य करार केला आहे.

‘हा सामंजस्य करार म्हणजे अधिकाधिक परदेशी पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन आघाडीच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सबरोबर केलेल्या योजनात्मक भागीदारीची सुरुवात आहे. उत्तमोत्तम योजना, उपक्रम राबवणं आणि सर्वाधिक निवडीचं पर्यटनस्थळ म्हणून राज्याची ओळख बनवणे हेच ध्येय असल्याचे मत महाराष्ट्राचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.

‘हा एक महत्त्वपूर्व करार असून महाराष्ट्र पर्यटन जागतिक अभियान आणि मार्केटिंग उपक्रमांना महत्त्वाचा पाठिंबा देईल. महाराष्ट्र पर्यटन आणि एतेहाद एअरवेजबरोबरच्या या अभिनव आणि महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे राज्याची प्रतिमा अधिक उज्ज्वल बनेल.’ असे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सचिव वल्सा नायर-सिंग म्हणाल्या.

‘एतिहाद आणि जेट एअरवेज ही एव्हिएशन क्षेत्रातली दोन महत्त्वपूर्ण नावे आहेत. यामुळे परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रातली विविध पर्यटनस्थळे सुचवण्यात मोलाची मदत होईल. केवळ पर्यटनस्थळ म्हणूनच अधिक स्पर्धात्मक बनणार नाही, तर यामुळे पर्यटकांकडे उपलब्ध असणाऱ्या पर्यायांमध्ये देखील वाढ होईल आणि एकाहून एक सरस अशा पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, असे वक्तव्य एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंद राज यांनी केले.

या करारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंद राज, आयएएस, राज्य सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक आणि एमडीटीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सचिव वल्सा नायर-सिंग, आयएएस, एतिहाद एअरवेजचे प्रादेशिक महाव्यवस्थापक नीरज भाटीया आणि जेट एअरवेजचे प्रमुख वाणिज्य अधिकारी जयराज षण्मुगम यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.