Advertisement

‘एलिफंटा’चा विकास आराखडा तातडीने सादर करा, पर्यटन राज्यमंत्र्यांच्या सूचना

एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

‘एलिफंटा’चा विकास आराखडा तातडीने सादर करा, पर्यटन राज्यमंत्र्यांच्या सूचना
SHARES

एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात एलिफंटा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. (maharashtra tourism state minister aditi tatkare orders mtdc to present development plan of elephanta caves)

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, पर्यटनाला चालना मिळेल आणि विकासकामांना गती येईल, असा एलिफंटा पर्यटन स्थळाचा सुधारीत विकास आराखडा तयार करुन तातडीने सादर करावा. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पर्यावरणपूरक विकासकामांवर भर देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी बैठकीला पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अमित सैनी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पर्यटन क्षेत्राचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अजिंठा-वेरुळ येथील लेण्यांचं जतन व संवर्धन करणं गरजेचे आहे. या संदर्भात अजिंठा लेणी पोर्ट्रेटचे सादरीकरण करण्यात आलं.

एलिफंटा किंवा घारापुरीची लेणी मुंबई शहराच्या पूर्वेकडील किनार्‍यापासून १० कि.मी.  अंतरावर असलेल्या समुद्रातील लहान बेटावर आहे. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरातील पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.९ वं शतक ते १३ वे शतक या कालखंडातील आहेत. १९८७साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा (हेरीटेज) स्थानाचा दर्जा दिला. घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचं एक शिल्प होतं, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असं नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईतील राणीच्या बागेत आहे.  


हेही वाचा -

५ महिन्यांपासून बंद असलेलं माथेरान पर्यटकांसाठी खुलं

आरेतील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Read this story in English
संबंधित विषय