Advertisement

मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्यास आझाद मैदानातच ठिय्या, माहुलवासीयांचा निर्धार

माहुलवासीय गेल्या २ दिवसांपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची भेट घेऊन सर्व मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानातून हटणार नाही, असा इशारा माहुलवासीयांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्यास आझाद मैदानातच ठिय्या, माहुलवासीयांचा निर्धार
SHARES

माहुल येथील प्रकल्पग्रस्त वसाहतींची दूरवस्था आणि प्रदूषणामुळे विविध आजारांनी ग्रासलेले माहुलवासीय गेल्या २ दिवसांपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची भेट घेऊन सर्व मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानातून हटणार नाही, असा इशारा माहुलवासीयांनी दिला आहे.


एेन थंडीत हाल

गेल्या ५१ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी माहुलवासीय विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेल्या माहुलवासीयांना रविवारी पोलिसांनी आझाद मैदानात थांबण्यास मनाई केली. नाईलाज म्हणून सर्व आंदोलनकर्त्यांना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म न. १८ वर रात्र काढावी लागली. आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक महिला व बालकांचा समावेश असून ऐन थंडीत त्यांना हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुख्यमंत्री मुंबईत असूनही सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही का? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी विचारला आहे.


आदेशाला बगल

राष्ट्रीय हरित लवादाने डिसेंबर २०१५ साली माहुल हा अतिप्रदूषित परिसर घोषित केला होता. त्याशिवाय या ठिकाणी राहणं हे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे. अस हरित लवादानं स्पष्ट केलं होतं. मुंबई उच्च न्यायलयानं ८ ऑगस्ट २०१८ मध्ये माहुल हा अतिप्रदूषित ठिकाण असून प्रकल्पग्रस्त पुनर्वासीतांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्याप माहुलवासीयांचं पुर्नवसन करण्यात आलेलं नाही.


शनिवारी माहुलवासीयांनी मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं. त्यानंतर सर्वजण आझाद मैदानात आले. जवळपास ३० हजार पेक्षा नागरिकांचा जीव धोक्यात असून सर्वजण मुख्यमंत्र्यांची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. परंतु मुख्यमंत्री आपला संपूर्ण दिवस उद्घाटन करत भाषणं देत घालवत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानातून हटणार नाही, असं आम्ही ठरवलं आहे.
- पूजा पुजारी, आंदोलनकर्त्या



हेही वाचा-

माहुलवासीयांना कुर्ल्यातील संक्रमण शिबिरांत हलवणार

माहुलऐवजी प्रकल्पबाधीत राहतोय भाड्याच्या घरात; शिवसेनेचा गौप्यस्फोट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा