Advertisement

ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग

आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग
SHARES

ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील (Cine Wonder Mall) इमारतीला भीषण आग लागली आहे. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे पश्चिम भागातील सिने वंडर मॉल व कोरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी या ठिकाणी आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले.

घटनास्थळी  लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.

ओरियन बिझनेस पार्कच्या इमारतीला आग लागली. त्यानंतर ही आग लगतच्या सिने वंडर मॉलच्या काही भागात पसरली आहे.

आगीची माहिती कळताच मॉल रिकामा करण्यात आला. ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याने काहीजण त्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा