कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

SHARE

कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर जवळील  मेहताब को-ऑप सोसायटी इमारतीला भीषण आग लागली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

दोन मजली असलेली ही इमारत आगीत जळून खाक झाली असल्याचे वृत्त आहे. इमारतीमधल्या एका घरातील सिलेंडरमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत कोणी जखमी झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या