दादर स्थानकात आणखी तीन प्लॅटफॉर्म

 Dadar
दादर स्थानकात आणखी तीन प्लॅटफॉर्म

दादर -  मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सीएसटी दरम्यान परळ टर्मिनस अस्तित्वात येणार असतानाच दादर स्थानकाचा कायापालट होणार आहे. मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर स्थानकात तीन फलाट नव्याने तयार केले जाणार आहेत. या स्थानकात केल्या जाणा-या पुर्नरचनेमुळे धीम्या जलद आणि लांब पल्यांच्या गाड्यांसाठी प्रत्येकी एक मार्गिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुखाचा होण्याची शक्यता आहे. परळवरुन भविष्यात लोकल सुरु होणार असल्यामुळे दादरच्या गर्दीचे प्रमाण थोडे कमी होईल. सध्या मध्य आणि पश्चिम दादर स्थानकांच्या मध्ये रेल्वेची मोकळी जागा आहे. पाचव्या सहाव्या मार्गिका या मोकळ्या जागेच्या बाजूनेच येणार आहेत. त्यामुळे फलाट क्रमांक एक आणखी पश्चिमेला जाणार आहे.

Loading Comments