बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) मलबार हिल येथे नव्याने बांधलेल्या लाकडी वॉकवेसाठी प्रवेश शुल्क (entry fee) आकारण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे देखभालीचा खर्च भागेल आणि स्वयंचलित गर्दी नियंत्रण प्रणाली लागू होईल, असे अहवालात म्हटले आहे.
मुंबईतील (mumbai) पहिला जंगल वॉकवे 427 मीटर लांबीचा आहे. तसेच या वॉकवेचे काम आता पूर्ण झाले आहे तसेच ते लवकरच खुले होण्याची अपेक्षा आहे. हा वॉकवे मलबार हिल (malbar hill) जंगलापासून दक्षिण मुंबईतील कमला नेहरू पार्कजवळील खडकांच्या रचनेपर्यंत पसरलेला आहे.
470 मीटर लांबी आणि 2.4 मीटर रुंदी असलेल्या या उन्नत संरचनेत लाकडी डेक आणि रेलिंगचा समावेश आहे. याला रोषणाई देखील केली आहे. त्यात काचेच्या तळाशी पाहण्याचा डेक, पक्षी निरीक्षण क्षेत्र देखील असणार आहे. तसेच येथून गिरगाव चौपाटीचे निसर्गरम्य दृश्य देखील दिसते.
महापालिकेने (bmc) या प्रकल्पात सुमारे 25 कोटी रुपये गुंतवले आहेत. ज्याची निविदा 2021 मध्ये काढण्यात आली होती आणि सुरुवातीला जानेवारीच्या मध्यात ती उघडण्याची अपेक्षा होती. अधिकाऱ्यांना आशा आहे की हा वॉकवे मोठ्या प्रमाणात देखभाल-मुक्त असेल.
तिकीट विक्रीमुळे देखभालीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. पालिकेने आश्वासन दिले की तिकिटाची किंमत सर्व पर्यटकांसाठी परवडणारी राहील.
महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिड-डेला सांगितले की, महापालिका त्यांच्या देखभालीसाठी महसूल निर्माण करणाऱ्या स्वयंपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य देत आहे. "आम्ही प्रशासकीय खर्च कमी करत असताना, आम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्प देखील हाताळत आहोत," असे अधिकाऱ्याने सांगितले.
पर्यटकांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी वॉकवेवर (walkway) स्वयंचलित गर्दी नियंत्रण प्रणाली असेल. या वॉकवेची क्षमता एकावेळेस 417 पर्यटक याचा वापर करतील इतकी आहे. वॉकवेची अद्वितीय वैशिष्ट्ये आणि पर्यावरणपूरक रचना यामुळे हे मुंबईतील एक लोकप्रिय आकर्षण बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा