Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मालाड इमारत दुर्घटना : बेकायदेशीर बांधकामाबद्दल पालिकेनं उपजिल्हाधिकार्याला दिलेले पत्र उघड

२०१० मध्ये पालिकेच्या पी-दक्षिण वॉर्डनं लिहिलेली काही पत्रं उघडकीस आली आहेत.

मालाड इमारत दुर्घटना : बेकायदेशीर बांधकामाबद्दल पालिकेनं उपजिल्हाधिकार्याला दिलेले पत्र उघड
SHARES

मालाडच्या (Malad) मालवणी इथं इमारतीचा भाग चाळीवर कोसळल्यानं १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या मुद्द्याकडे लक्ष वेढलं गेलं आहे. याप्रकरणी महानगरपालिकेवर (BMC) आरोप केले जात आहेत. यावर पालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

तथापि, इमारती जिल्हाधिकाऱ्याच्या जमिनीवर असल्याचा दावा करून प्रशासकिय यंत्रणेनं आता परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या विचारात आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, ते या धोकादायक रचनांबद्दल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचित करीत आहेत.

“आम्ही बेकायदा रचना, तसंच धोकादायक इमारतींबद्दल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना देत आहोत. आम्ही त्यांना या इमारतींची तपासणीही करण्याची विनंती केली होती, 'अशी माहिती फ्री प्रेस जर्नलनं दिली आहे.

२०१० मध्ये पालिकेच्या पी-दक्षिण वॉर्डनं लिहिलेली काही पत्रं उघडकीस आली आहेत. ज्यात नवीन जिल्हाधिकारी कम्पाऊंडमधील मालवणी गेट क्रमांक ८ इथल्या जीर्ण झालेल्या संरचनेबद्दल उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) यांना सूचित केलं गेलं आहे.

या पत्रांवरून असं दिसून आलं आहे की, या बेकायदा बांधकामांबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्याव्यतिरिक्त प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक अभियंता यांनी तपासणीची शिफारस केली. मे आणि सप्टेंबर २०१९ दरम्यान दोन्ही पत्रं उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली गेली.

भाजप नगरसेवक विनोद मिश्रा तसेच खासदार गोपाळ शेट्टी यांनी याप्रकरणी कारवाई करण्यासाठी पालिकेला पत्र लिहिलं होतं.

विनोद मिश्रा यांनी घटनेनंतर सांगितलं की, “इमारती बेकायदेशीररित्या तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यात गंभीर रचनात्मक दोष आहेत. आम्ही वेळोवेळी या गोष्टीकडे लक्ष वेधत होतो.”

या घटनेसाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी भ्रष्टाचार आणि व्होट बँक राजकारणाला जबाबदार धरलं आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडे ट्वीटमध्ये बोट दाखवलं.

या आरोपाला उत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “यासाठी दोषींनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे कोणाच्या कारभारावर होतं हे पाहण्याऐवजी या कारणासाठी कोण जबाबदार आहे हे निश्चित केलं पाहिजे. प्रत्येकानं जबाबदारी घेतली असती तर असे झाले नसते.”

दरम्यान, मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Malad Building Collapse) काही भाग कोसळून १२ जणांचा मृत्यू (death) झाला.  या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख असं या ठेकेदाराचं नाव आहे. तर इमारत मालक रफिक सिद्दीकी यालाही आरोपी करण्यात आलं आहे.हेही वाचा

मुंबईतील साचलेल्या पाण्यातून चालल्यास होऊ शकतो 'हा' आजार; महापालिकेकडून महत्त्वाच्या सूचना जारी

दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एकाचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा