Advertisement

दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एकाचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे दहिसर येथील शिवाजी नगरमधील लोखंडी चाळ येथे तीन घरे कोसळली आहेत. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईत बुधवारी मध्यरात्री मालाड (malad) मध्ये तीन मजली घर कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता गुरूवारी अशीच दुर्घटना दहिसर (dahisar) मध्ये घडली. दहिसरमधील शिवाजी नगर येथे तीन घरं कोसळली (houses collapse) आहेत. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू (death) झाला आहे. प्रद्युम्न सरोज (२६) असं मृताचं नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे दहिसर येथील शिवाजी नगरमधील लोखंडी चाळ येथे घराखालची माती सरकल्यामुळे तीन घरे कोसळली आहेत. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम  सुरु आहे. अग्निशमन दलाने  सात ते आठ जणांना बाहेर काढले. या दुर्घटनेत प्रद्युमन सरोज या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक तरुण जखमी झाला आहे. 

मालाड मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग शेजारील घरांवर कोसळला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमींच्या उपचारासाठीचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.



हेही वाचा -

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा