COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारास अटक

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारास अटक
SHARES

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Malad Building Collapse) काही भाग कोसळून १२ जणांचा मृत्यू (death) झाला.  या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख असं या ठेकेदाराचं नाव आहे. तर इमारत मालक रफिक सिद्दीकी यालाही आरोपी करण्यात आलं आहे.

इमारतीच्या मालकासह ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा अंत झाला. यामध्ये ६ मुलांचा समावेश आहे. तर मृतांचा एकूण आकडा १२ झाला आहे. तसंच यामध्ये ८ जण जखमी झाले. 

जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. कोसळलेल्या घराचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली कोणी अडकले आहे का त्याचाही शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची कांदिवलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली.हेही वाचा -

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा