Advertisement

उद्यानातील झोपाळा ठरतोय आकर्षण


उद्यानातील झोपाळा ठरतोय आकर्षण
SHARES

आदर्श नगर - मालाड पश्चिमेकडील आदर्शनगर येथील राजीव गांधी उद्यानात लावण्यात आलेला विशेष झोपाळा सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. स्थानिक नगरसेवक परमिंदर भामरा यांच्या निधीतून या झोपाळ्याचे बांधकाम करण्यात आलं आहे. पूर्वी मुलगी झोपाळ्यावर बसली की तिला मागून झोका द्यावा लागत असे, मात्र आता मुलीसोबत झोपाळ्यावर बसता येत असल्याने आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया तिथे आलेल्या गीता पाटील यांनी व्यक्त केली. मुंबईत अशा पद्धतीने लावण्यात आलेला हा पहिलाच झोपाळा असल्याचे नगरसेवक भामरा यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा