Advertisement

मुंबई, ठाण्यातील मॉल राहणार बंद!

मुंबई व ठाणेकरांना मॉलमध्ये जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यानुसार मुंबई, ठाण्यातील मॉल बंदच राहणार आहेत.

मुंबई, ठाण्यातील मॉल राहणार बंद!
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव राज्यातील अनेक जिल्ह्यांत ओसरला असून, या जिल्ह्यांसाठी सरकारनं निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. विषेश म्हणजे यावेळी राज्य सरकारनं दुकानदारांचा विचार करत कोरोना निर्बंध शिथिल करताना दुकानांची वेळमर्यादा वाढवून मॉलही खुले ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, असं असलं तरी मुंबई व ठाणेकरांना मॉलमध्ये जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यानुसार मुंबई, ठाण्यातील मॉल बंदच राहणार आहेत.

मुंबई पालिका आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी परिपत्रक काढून मॉलवरील निर्बंध कायम असल्याचं स्पष्ट केल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानं राज्य सरकारनं अनेक निर्बंध शिथिल करताना दुकानांची वेळमर्यादा वाढवून मॉल खुले ठेवण्यासही परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आला. त्यानुसार मुंबई पालिकेनं सोमवारी परिपत्रक काढून आठवड्याचे ७ ही दिवस रात्री १० वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या परिपत्रकात मॉलवरील निर्बंधांबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्यानं मॉल सुरू करण्याची तयारी व्यवस्थापकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मंगळवारी पुन्हा परिपत्रक काढून मॉल बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ठाणे जिल्हा प्रशासनानंही मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील दुकानांची वेळमर्यादा वाढवितानाच जिल्हा प्रशासनाने मॉलवरील बंदी कायम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केलं.

ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठक घेतली. जिल्ह्यातील सर्वच पालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी त्यास उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेनंतर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा आदेश काढला. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. ही दुकाने रविवारी बंद राहणार आहेत. औषधालये सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. रेस्टॉरंट आणि उपाहारगृहे ५० टक्के क्षमेतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.



हेही वाचा -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा