Advertisement

मुलुंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

मुलुंडच्या राहुल नगर भागात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सूरज गवई असं जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे.

मुलुंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी
SHARES

मुलुंडच्या राहुल नगर भागात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सूरज गवई असं जखमी झालेल्या तरूणाचं नाव असून के. ई. एम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळे राहुल नगर भागात प्रचंड दहशत पसरली आहे.


रात्री काॅलनीत शिरला बिबट्या

मुलुंडच्या राहुल नगर कॉलनीत रात्री २ च्या सुमारास बिबट्या शिरला. या परिसरात राहणाऱ्या सूरज गवई यांच्या पाळीव कुत्र्याला पाहून बिबट्यानं जोरात डरकाळी फोडली. त्या डरकाळीनं घाबरलेल्या कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरूवात केली.अचानक हल्ला

डरकाळीच्या आवाजाने जाग आलेले घरातील सर्वजण घराबाहेर आले. घराबाहेर येताच बिबट्याने सूरजवर झडप घातली. या हल्ल्यात त्याच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर इजा झाली. सूरजला उपचारांसाठी त्वरीत के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यापूर्वीही मुलुंडच्या नानेपाड्यात बिबट्याने अशाप्रकारे हल्ला केला होता. त्यात ६ जण गंभीर जखमी झाले होते. मुलुंडच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढत असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी तेथील स्थानिक करत आहेत.


सूरजच्या डोळ्याखाली आणि डोक्याच्या काही भागात इजा झाली आहे. सध्या सूरजवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल.
- अविनाश सुपे, अधिष्ठाता, के. ई. एम. रुग्णालयहेही वाचा-

कस्टम ड्युटी चुकवून सोने तस्करी; २१ लाखांची ५८ बिस्किटं हस्तगतRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा