Advertisement

रुग्णांची माहिती महापालिकेला देणं बंधनकारक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं कोणतीही कल्पना न देता खासगी रुग्णालयांतील ८० टक्के राखीव खाटांवर कोरोनाबाधित रुग्णांची भरती करण्यात येत असल्याची गंभीर दखल घेतली आहे.

रुग्णांची माहिती महापालिकेला देणं बंधनकारक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं कोणतीही कल्पना न देता खासगी रुग्णालयांतील ८० टक्के राखीव खाटांवर कोरोनाबाधित रुग्णांची भरती करण्यात येत असल्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार, आता महापालिकेतील वॉर रुमला माहिती देऊनच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करावे, आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.

मुंबईमधील खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या असून या खाटांचे नियोजन पालिकेच्या विभाग कार्यालयांतील वॉर रुमच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे असताना खासगी रुग्णालयांकडून या खाटांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या खाटा परस्पर रुग्णांना उपलब्ध करण्यात येत आहेत. यामुळे खाटांच्या नियोजनावर परिणाम होत आहे. तसेच रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी नवे आदेश जारी केले.

मुंबईमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेला माहिती दिल्याशिवाय खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना प्रवेश देता येणार नाही, असे या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या आदेशांनुसार मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित विषय