Advertisement

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा दाखल

परदेशातून आयात होणाऱ्या हा आंबा चवीला गोड असतो. ४ किलोची पेटी साडेतीन ते ४ हजार रूपयाला विकली जात आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा दाखल
SHARES

सध्या आंबाच्या (mango) सिझनला अवकाश असला तरी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (navi mumbai apmc market) आंबा दाखल झाला आहे. हा आंबा स्पेन आणि ब्राझीलचा येथून दाखल झाला असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. परदेशातून आयात होणाऱ्या हा आंबा चवीला गोड असतो. ४ किलोची पेटी साडेतीन ते ४ हजार रूपयाला विकली जात आहे.

स्पेन आणि ब्राझीलहून सुरूवातील आंब्याच्या ५ पेट्या आल्या होत्या. ५ किलोची ही प्रत्येक पेटी ४ हजार रूपये दरानं विकली गेली. त्यानंतर ४३ पेट्या आल्या. ही एक पेटी ३६०० रूपये दरानं विकली जात आहे. विशेष म्हणजे या आंब्याला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा कांद्याची (onion) आवक कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इराण येथून एपीएमसीत कांदा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता स्पेन आणि ब्राझीलचा आंबाही दाखल झाला आहे. त्यामुळं आता या परदेशी आंब्याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement