Advertisement

नवीन जेट्टीच्या कामासाठी खारफुटींची कत्तल

मोठ्या प्रमाणात कांदळवनांची म्हणजेच खारफुटी क्षेत्राची कत्तल करण्यात येत आहे. यावरून पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नवीन जेट्टीच्या कामासाठी खारफुटींची कत्तल
SHARES

विरारच्या (virar) मारंबळपाडा परिसरात जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टीपर्यंत नवीन रस्ता तयार केला जात आहे. मात्र या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनांची म्हणजेच खारफुटी (mangroves) क्षेत्राची कत्तल करण्यात येत आहे. यावरून  पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विरार पश्चिमेला मारंबळपाडा परिसर आहेत. येथील खाडी किनाऱ्याचा भाग हा कांदळवन वृक्षांच्या निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. याच भागात आता नवीन जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे.

जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टी (jetty) असा जवळपास अर्ध्या किलोमीटरचा रस्ता तयार केला जात आहे. यासाठी कांदळवन असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात माती भराव टाकला जात आहे.

त्यामुळे शेकडो कांदळवनांच्या वृक्षांची यात कत्तल (cutting) केली जात आहे. अशा मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा