Advertisement

दहिसरमध्ये खारफुटीची सर्रासपणे कत्तल


दहिसरमध्ये खारफुटीची सर्रासपणे कत्तल
SHARES

दहिसर पश्चिमेकडील लिंकरोडला लागून असलेल्या गणपत पाटील नगरमधील गल्ली क्रमांक 2 मध्ये खारफुटीची सर्रास कत्तल होतेय. या खारफुटीच्या जागी बेकायदेशीरपणे भराव टाकण्यात येत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या आर/उत्तर विभागाकडे करूनही महापालिका याप्रकरणी कुठलीही कारवाई करत नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे.

मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून तेथे अनधिकृतरित्या झोपडपट्टी वसवणाऱ्या टोळ्या शहरात ठिकठिकाणी कार्यरत आहेत. या टोळ्या खाडी परिसरातील खारफुटींची कत्तल करून तेथे भराव टाकून झोपड्या उभारण्यात तरबेज असतात. असाच प्रकार दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरात घडताना दिसून येतोय. गणपत पाटील नगरमध्ये सध्याच्या घडीला कमीत कमी 15 हजार झोपड्या असून या झोपड्यांमध्ये अंदाजे 8 हजार मतदार राहतात.

गेल्याच महिन्यात वन विभागाने झोपडपट्टीची हद्द संपल्यानंतर जेथून खारफुटी सुरू होते त्या गल्ली क्रमांक 1 पासून 16 पर्यंत सीमारेषा आखली होती. मात्र वन विभागाने आखलेल्या या सीमारेषेच्या मर्यादेचे उल्लंघन करत येथील रहिवाशांनी बेधडकपणे खारफुटींची कत्तल सुरू केलीय. आता या ठिकाणी जागोजागी नव्या झोपड्या वसवलेल्या दिसून येताहेत. यासंदर्भात अॅड. विमलेश झा यांनी महापालिकेच्या आर/उत्तर विभागाकडे जाऊन या खारफुटीच्या कत्तलीची तक्रारही नोंदवली. परंतु महापालिकेने अद्याप याप्रकरणी कुणावरही कारवाई केलेली नाहीय. महापालिकेच्या आर/उत्तर विभागातील सब इंजिनिअर समीर गुरव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा