Advertisement

विशेष अधिवेशनानिमित्त मंत्रालय रविवारी सुरु राहणार


विशेष अधिवेशनानिमित्त मंत्रालय रविवारी सुरु राहणार
SHARES

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणि त्या अनुषंगाने इतर विधेयके मांडून पारित करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे द्वितीय अधिवेशन 20 ते 22 मे 2017 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे रविवार 21 मे या शासकीय सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचे कामकाज सुरु राहणार आहे.

रविवार 21 मे 2017 या शासकीय सुट्टीच्या दिवशी विधानमंडळात होणारे कामकाज विचारात घेऊन या कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयातील संबंधितांना उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा