मुंबई महापालिका सभागृहात 'वस्त्रहरण'!

 CST
मुंबई महापालिका सभागृहात 'वस्त्रहरण'!

सीएसटी - मुंबई महापालिका सभागृहात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित लेखक-दिग्दर्शक प्रदीप कबरे यांनी वस्त्रहरण नाटकातील काही भागाचे अभिवाचन केले. तर शिक्षण विभागातील कलामंच विभागाने मराठी गाणी सादर केली. 

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी लेखक गंगाराम गव्हाणकर आणि लेखक प्रदीप कबरे यांचा सत्कार केला. या वेळी महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त अजॉय मेहता, वस्त्रहरण फेम लेखक गंगाराम गव्हाणकर, नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments