बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मुंबईतील मरीन ड्राइव्हवर 110 LED लाईट्स लावण्याची योजना आखली आहे. पुढील महिन्यात, एअर इंडिया इमारतीपासून ते नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) पर्यंतच्या रस्त्यावर 110 एलईडी लाईट बसवण्यात येतील.
मरीन ड्राइव्ह हे शहरातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी आहे. स्थानिक रहिवाशी इथे मॉर्निंग वॉकसाठीच नव्हे तर समुद्राचा आनंद घेण्यासाठी जातात.
बऱ्याचदा वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेट सामन्यांनंतर मरीन ड्राईव्हवर गर्दी होते. इथे लावण्यात आलेल्या लाईट्स देखील कमी पडतात. अशा परिस्थितीत, बीएमसी तात्पुरती रोषणाईची व्यवस्था करते.
"मरीन ड्राइव्ह हे एक लोकप्रिय ठिकाण असल्याने, येथे दररोज मोठी गर्दी होते. क्रिकेट सामन्यांसारख्या विशेष कार्यक्रमांमध्ये आम्ही तात्पुरते दिवे बसवतो. परंतु आता आम्ही प्रॉमेनेस्टच्या शेजारी असलेल्या झाडांखाली कायमस्वरूपी एलईडी बसवण्याची योजना आखत आहोत," असे बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.