Advertisement

APMC मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी मास्क बंधनकारक

एपीएमसीच्या पाचही बाजारपेठेच्या उपसचिवांना बाजार आवारात मास्क अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

APMC मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी मास्क बंधनकारक
SHARES

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे एपीएमसी मार्केट (APMC Market) प्रशासनानं खबरदारीचे उपाय उचलण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसीमध्ये प्रवेशासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. ग्राहक, व्यापारी, कामगार सर्वांनीच मास्क घालणं सक्तीचं करण्यात आलं आहे.

एपीएमसीच्या पाचही बाजारपेठेच्या उपसचिवांना बाजार आवारात मास्क अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी ट्रक ड्रायव्हर, माथाडी कामगार, व्यापारी तसेच येणाऱ्या ग्राहकांचे संपूर्ण लसीकरण आणि मास्क अनिवार्य केले आहे. तसंच लसीकरणाची व्यवस्थाही एपीएमसी प्रशासनानं केली आहे.

दरम्यान, हाय रिस्क देशांतून १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान, २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. त्यापैकी ४८५ प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाल्यापासूनच देशासह राज्यातही सर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अशातच मुंबई महापालिकेनंही ओमायक्रॉनचा धोका ओळखून अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी गाईडलाईन्सही लागू करण्यात आल्या आहेत.

कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण दुबईला (First Omicron patient) पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक जण ६६ वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले.हेही वाचा

वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय? भरावा लागेल 'इतका' दंड

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे १०वी-१२वीचे परीक्षा क्षुल्क माफ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा