Advertisement

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवर


माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवर
SHARES

मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. चार महिन्यानंतर माथेरानची राणी मंगळवारपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पावसाळ्यातील चार महिने मिनी ट्रेनची नेरळ ते माथेरान ही सेवा बंद असल्यामुळं अनेकदा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आता मंगळवारपासून मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवर येणार आहे.


वातानुकूलित, पारदर्शक डबे

पावसाळ्यातील चार महिने नेरळ ते माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सेवा बंद ठेवली जाते. आता चार महिने उलटले असून नवीन डब्यांचा साज म्हणजे वातानुकूलित आणि पारदर्शक डबे माथेरानच्या राणीला असणार आहे.  

१५ जूनपासून होती बंद

मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा १५ जून रोजी बंद करण्यात आली होती. या काळात मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे दुरुस्त करण्यात आले आहेत. तसंच, मिनीट्रेनसाठी एनडीएम १-४०२ आणि ४०३ ही दोन नवी इंजिनं तयार करण्यात आली आहेत. मिनी ट्रेनचा प्रवास आनंदमयी व्हावा यासाठी प्रवासी डबे आकर्षक करण्यात आले आहेत. या पारदर्शक प्रवासी डब्यांवर माथेरानमधील रस्त्यावर चालणारे घोडे, जंगलातील पक्षी-प्राणी, प्रेक्षणीय स्थळे, बाजारपेठ, यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा