Advertisement

माटुंगा: वादग्रस्त पार्किंग टॉवरमुळे रहिवासी पालिकेवर संतप्त

पालिकेने यात तातडीने लक्ष द्यावे अन्यथा जनहित याचिका दाखल करण्यात येईल असे रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे.

माटुंगा: वादग्रस्त पार्किंग टॉवरमुळे रहिवासी पालिकेवर संतप्त
SHARES

माटुंगा (matunga) स्थानकातील स्थानिक रहिवाशांनी महापालिकेला माटुंगा स्थानकाबाहेरील वादग्रस्त पार्किंग टॉवरबाबत पत्र लिहिले आहे. तसेच पालिकेने यात तातडीने लक्ष द्यावे अन्यथा जनहित याचिका दाखल करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

फ्री प्रेस जर्नलने 28 नोव्हेंबरला दिलेल्या बातमीनुसार माटुंगा रहिवाशांनी (residents) मल्टी-लेव्हल रोबोटिक पार्किंग टॉवर (MRPT) च्या बांधकामाला कडाडून विरोध करत असल्याची माहिती दिली होती. 

येथील स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला सुरक्षेचा धोका आहे असे सांगून विरोध केला आहे. महापालिकेने यावर व्यावसायिक संकुल बांधणाऱ्या बिल्डरला मदत करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला जात असल्याचे सांगितले.  

तसेच या प्रकल्पाची संयुक्त तपासणी करण्यात येईल असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

मात्र, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलासरू, मुख्य अभियंता (विकास योजना) आणि इतर वरिष्ठ अधिकारी चेतन त्रिवेदी आणि याचिका समूहाचे विश्वस्त जी आर व्होरा यांना रहिवाशांनी ईमेलद्वारे तक्रार केली होती.  

या तक्रारीत असे म्हटले गेले आहे की, 27 नोव्हेंबर रोजी जेव्हा पहिली संयुक्त तपासणी झाली तेव्हा महापालिकेचे अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. पालिकेच्या वाहतूक विभागाचा एक प्रतिनिधी नंतर आला होता.

त्यांना स्थानिकांनी विचारले असता दोघांनी सांगितले की, अधिकारी कागदपत्रे बाळगत नाहीत किंवा स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. पुन्हा एकदा महापालिका स्थानिक रहिवाशांचा विचार न करता बिल्डर तसेच खाजगी कंपन्यांच्या कलेने विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



हेही वाचा

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर तात्पुरती बंद

मुंबईत 10 टक्के पाणीकपात!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा