माटुंगा ब्रीज कोसळण्याची वाट बघतेय का पालिका?

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) माटुंगा स्थानकाबाहेरील (Matunga Staion) सेनापती बापट मार्गावर दररोज वेगवेगळे अपघात (Accidents) होत आहेत.

SHARE

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) माटुंगा स्थानकाबाहेरील (Matunga Staion) सेनापती बापट मार्गावर दररोज वेगवेगळे अपघात (Accidents) होत आहेत. या अपघातांमध्ये या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना आपला जीव गमवावा लागतो आहे. विशेष म्हणजे माटुंगा स्थानकाबाहेरील परिसरातील पादचारी पूल (FOB) धोकादायक स्थितीत आहे. या पूलाच्या पायऱ्यांना तडा गेला असून, हा पूल कधीही कोसळू (Collapse) शकतो. त्यामुळं या पूलाची (Bridge) लवकरात लवकर दुरूस्ती (Repair) यासाठी रहिवाशांनी अनेकदा पोलीस (Police) व महापालिकेकडं (BMC) तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यांच्या तक्रारीकडं वारंवार दुर्लक्ष केल्याचं रहिवाशांनी सांगितलं.

धोकादायक पादचारी पूलाच्या समस्येसह वाहतुकीच्या समस्यांनाही (Issues) रहिवाशांनाही तोंड द्याव लागतं आहे. दादर फुल मार्केट (Dadar Flower Market) येथून माहिमच्या (Mahim) दिशेनं जाण्यासाठी वाहक सेनापती बापट मार्गाचा (Senapati Bapat Marg) वापर करतात. या मार्गावर वेगानं गाड्या जात असतात. परंतु, या मार्गावरील माटुंगा स्थानकाबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याची माहिती या परिसरात राहणारे अशोक त्रिवेदी या रहिवाशांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी ८० वर्षाच्या आजी व २५ वर्षाच्या तरूण मुलाचा अपघात झाला असल्याचंही अशोक त्रिवेदी यांनी म्हटलं. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या (Safety) दृष्टीनं येथील रहिवाशी लवकरात लवकर या पूलाची दुरूस्ती करण्यात यावी अथवा पूल तोडावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत. त्याचप्रमाणं परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची (Traffic Police) नियूक्ती करण्यात यावी अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या