Advertisement

लोअर परळमध्ये विकासकामांना सुरुवात


लोअर परळमध्ये विकासकामांना सुरुवात
SHARES

लोअर परळ - मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते लोअर परळ भागातील रुस्तम वाडिवाला चाळ, वाणी चाळ आणि सौराब चाळ या भागात विविध नागरी सेवा-सुविधांच्या कामाची सुरुवात सोमवारी करण्यात आली. या परिसरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, अस्वच्छता, रस्त्यावर खड्डे, उखडलेले पदपथ अशा अनेक समस्यांंना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे याची दखल घेत महापौर आंबेकर यांनी विकासकामांना सुरुवात केली. रहिवाशांच्या अडचणी लक्षात घेत या भागात विविध दर्जेदार नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वेळी राम साळगांवकर, छाया कोळी, किशोरी काजोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा