Advertisement

हुक्का बंदीसाठी महापौरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट


हुक्का बंदीसाठी महापौरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरात आजही मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत. गुन्हेगारी क्षेत्रांतील गुन्हेगार आणि समाजकंटक यांचा या हुक्का पार्लरमध्ये सर्रास वावर होत असतो. मादक पदार्थांचं सेवन केल्यानंतर स्वतःवरचं नियंत्रण घालवून बसलेल्या आजच्या तरुणाईकडून मारामाऱ्या, खून असे प्रकार घडतात. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेत मुंबईतील सर्व हुक्का पार्लर त्वरित बंद करण्याची मागणी केली. 


'ठोस कारवाई करा'

सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेत महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या सामन्वयातून सर्वांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं.  

यापूर्वी माजी महापौर शुभा राऊळ यांनी हुक्का बंदीबाबत मोहीम हाती घेत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्यानंतरही मुंबईत हुक्का पार्लर आजही सुरू आहेत. तसेच मागील २ विधी समितीच्या बैठकीत हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांकडून केली जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा