मुंबई पोर्ट ट्रस्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन

 Pali Hill
मुंबई पोर्ट ट्रस्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन

बॅलार्ड इस्टेट - विजयदीप इथे मुंबई पोर्ट ट्रस्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन ३१ डिसेंबरला करण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे दिनदर्शिकेचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्‍वस्त सुधाकर अपराज, सेक्रेटरी मारुती विश्‍वासराव, विजय रणदिवे, उपाध्यक्ष लहू कोकणे, विजय काशिलकर, संघटक चिटणीस दत्ता खेसे आणि निसार सुनूस आदी उपस्थित होते.

Loading Comments 

Related News from सिविक