पुनर्विकासासंदर्भात शंकांचे निरसन

 BDD Chawl
पुनर्विकासासंदर्भात शंकांचे निरसन
पुनर्विकासासंदर्भात शंकांचे निरसन
पुनर्विकासासंदर्भात शंकांचे निरसन
See all

वरळी - बीडीडी चाळीचा प्रस्तावित पुनर्विकास, भाडेकरूंचे प्रश्न, जागेचे व्यवस्थापन अशा विविध शंकांच्या निसरणासाठी बुधवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या दालनात आमदार सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी बीडीडी पुनर्विकास प्रकियेचा आढावाही घेण्यात आला. पुनर्विकास प्रकियेबाबत बीडीडी भाडेकरूंनी विचारलेल्या अनेक शंकाचे समाधानकारक निरसन प्रशासनामार्फत करण्यात आले. दरम्यान लवकरच योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही म्हाडा अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिली. यावेळी बीडीडी चाळीतील अनेक भाडेकरू आणि विविध कमिटीचे सदस्य उपस्थित होते. आता सरकार सगळ्याच मागण्या मान्य करेल का? याकडे बीडीडी रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

Loading Comments