बेस्ट मेगाभरतीला वादाचे ग्रहण

  Pali Hill
  बेस्ट मेगाभरतीला वादाचे ग्रहण
  मुंबई  -  

  मुंबई - बेस्ट प्रशासनाकडून तब्बल नऊ वर्षानंतर करण्यात येणाऱ्या 961 चालकांच्या मेगा भरतीला वादाचं ग्रहण लागलंय. प्रशासनानं बेस्ट समिती अध्यक्ष आणि सदस्यांना विश्वासात न घेता, समितीला अंधारात ठेवत मेगाभरतीची प्रक्रिया राबवल्याचं म्हणत समितीनं या मेगाभरतीला विरोध केला आहे. या भरतीवरून मंगळवारच्या समितीच्या बैठकीत चांगलाच वाद रंगला. भरतीला विरोध नाही, पण समितीला अंधारात ठेवून प्रशासन स्वतः निर्णय घेतंय, त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यानं यासंबंधीचा निर्णय घेत जाहिरात दिली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. शेवटी याच वादामुळे बैठक तहकूब करण्यात आली. जाहिरात देणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा या भरतीला विरोध असेल, अशी माहिती समिती सदस्य रवी राजा यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

  मेगाभरतीबद्दल माहिती -

  961 चालकांची भरती

  अॉनलाइन पद्धतीनं भरती
  शैक्षणिक पात्रता सातवी उत्तीर्ण
  अवजड वाहन चालवण्याचं लायसन्स
  सार्वजनिक वाहन चालवण्यासाठी आवश्यक बिल्ला
  वाहन चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
  मासिक वेतन एकूण 17,080 रुपये
  मोफत बसपास
  ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.