Advertisement

म्हाडाची लॉटरी जाहीर, 'अशी' पाहा लाभार्थ्यांची यादी

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडाची लॉटरी जाहीर, 'अशी' पाहा लाभार्थ्यांची यादी
SHARES

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आज म्हाडा कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती.

या लॉटरीतील ८ हजार ९४८ घरांसाठी तब्बल २ लाख ४६ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली.

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात आली. http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

इच्छुक खरेदीदारांच्या मासिक पगाराप्रमाणे ही लॉटरी घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांच्या श्रेणीत विभागली गेली आहेत .

१) २५ हजार रुपयांखालील मासिक उत्पन्न असलेले अर्जदार EWS घरांसाठी ५००० रुपये देऊन अर्ज करू शकतात.

२) एलआयजी घरांसाठी, मासिक उत्पन्न २५ हजार ते ५० हजार  दरम्यान असावे. त्यांच्यासाठी १० हजार रुपये अर्जाची रक्कम आहे. 

३) एमआयजी खरेदीदारांचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असावे आणि त्यांना १५ हजार रुपये जमा करणे आवश्यक आहे.

४) उच्च उत्पन्न गटासाठी, खरेदीदारांनी दरमहा ७५ हजारपेक्षा जास्त कमाई करावी आणि २० हजार रुपये जमा करावे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा