Advertisement

म्हाडाची लॉटरी अजूनही गुलदस्त्यात


म्हाडाची लॉटरी अजूनही गुलदस्त्यात
SHARES

गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे मुंबईत पुन्हा दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा तर संपली.
पावसाप्रमाणे आता मुंबईकर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरता म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत आहेत. पण लॉटरीही पावसाप्रमाणे दडून बसली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लॉटरीची तयार सुरू असताना प्रत्यक्षात मात्र लॉटरीची जाहीरात काही प्रसिद्ध होताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा वाढतच चालली आहे. दुसरीकडे म्हाडा प्राधिकरण वा मुंबई मंडळाकडून मात्र लॉटरीची माहिती गुलदस्त्यातच ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून मे महिन्यांत लॉटरी काढली जाते. यंदा मात्र मुंबई मंडळाने हा ट्रेण्ड मोडीत काढला आहे. मुंबई मंडळाकडे लॉटरीसाठी घरेच नसल्याने मे महिन्याचा मुहूर्त चुकला. त्यातही मुंबई मंडळाने घरे शोधून काढली पण घराचा आकडा काही केल्या 1000 च्या घरात जात नसल्याने लॉटरी रखडली. पण शेवटी 783 घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेत लॉटरीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही प्रक्रिया काही संपता संपताना दिसत नाही.


घरांच्या किमतींच्या निश्चितीमुळे जाहीरात रखडली

यंदाच्या लॉटरीतील पवई, तुंगा येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत 1 लाख 61 कोटी असल्याचे वृत्त सर्वप्रथम मुंबई लाइव्हने प्रसिद्ध करत चांगलची खळबळ माजवून दिली होती. या वृत्तानंतर म्हाडावर सडाडून टीका झाल्याने मुंबई मंडळाने या घराच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला.
त्याचवेळी लॉटरीतील इतर घरेही महाग असल्याची चर्चा होती. त्यामुळे लॉटरीतील सर्वच घरांच्या किमतींची पुनर्निश्चिती असल्याने जाहिरातीस विलंब होत असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पवईतील 1 कोटी 61 लाखाच्या घराची किंमत 1 कोटी 40 लाखांपर्यंत आणण्यात आल्याचेही समजते आहे.


लॉटरीची तयारी सुरू असून घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच लॉटरीची जाहीरात प्रसिद्ध करत मुंबईकरांना गुडन्यूज देऊ. पण काही तांत्रिक अडचणी असल्याने नेमकी जाहिरातीची वा लॉटरीची तारीख आताच सांगता येणार नाही.
- सुभाष लाख, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा


हेही वाचा - 

म्हाडाने अखेर ती 159 घरे लॉटरीतून वगळली!

अखेर म्हाडाने विजेत्यांना पाठवली सूचनापत्र



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा