Advertisement

म्हाडाने अखेर ती 159 घरे लॉटरीतून वगळली!


म्हाडाने अखेर ती 159 घरे लॉटरीतून वगळली!
SHARES

'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर म्हाडाने अखेर ऑगस्टच्या लॉटरीतून मास्टर लिस्टमधील 159 घरे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2017 मधील लॉटरीतील घरांची संख्या वाढवण्यासाठी मास्टर लिस्टमधील घरांवर डल्ला मारायचा घाट कशाप्रकारे घातला? याचा पर्दाफाश 'मुंबई लाइव्ह'ने केला होता.


मुंबई लाइव्हचा दणका

मास्टर लिस्टमधील घरे ही मूळ मास्टरलिस्ट मधील राहिवाशांशिवाय कुणालाही देता येत नाहीत. असे असताना ही घरे 2017 च्या लॉटरीत विकण्याच्या हालचाली मुंबई मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाने सुरु केल्या होत्या. या विषयीचे सविस्तर वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते.

यासंबधीचे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केल्यावर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई मंडळाने ही घरे लॉटरीत घेता येतील का? याची खात्री करून घेण्यास सुरुवात केली. ही घरे घेता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर मुंबई मंडळाने ही घरे लॉटरीतून वगळली आहेत. त्यामुळे मास्टरलिस्टमधील घरे आता मास्टरलिस्टमधील रहिवाशांनाच मिळतील.


मास्टर लिस्टमधील घरे लॉटरीत घेता येणार नाहीत. तशी तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे लॉटरीत या घरांचा समावेश नाही.


- सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ


मास्टरलिस्ट म्हणजे काय?

उपकरप्राप्त धोकादायक, अतिधोकादायक इमारतीतील वा कोसळलेल्या इमारतीतील राहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते. ज्या इमारतीचा पुनर्विकास होणारच नाही, अशा इमारतीतील संक्रमण शिबिरार्थींना उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळालेल्या अतिरिक्त घरांमधील घरांचे वितरण करण्यासाठी म्हाडाकडून जी यादी बनवली जाते तिला मास्टरलिस्ट म्हणतात.



हे देखील वाचा -

ऑगस्टमध्ये म्हाडाच्या 800 घरांची लॉटरी!

आता म्हाडाची फी भरा ऑनलाईन!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा