अखेर म्हाडाने विजेत्यांना पाठवली सूचनापत्र


SHARE

गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांसाठीच्या लॉटरीतील विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवण्यास अखेर म्हाडाकडून सुरुवात करण्यात आली आहे. लॉटरी होऊन सहा महिने झाले तरी, म्हाडाकडून प्रथम सूचना पत्र पाठवले जात नसल्याने विजेत्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर असल्याबद्दलचे वृत्त मुंबई लाइव्हने पंधरा दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते.

या वृतानंतर खडबडून जागे झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतेच प्रथम सूचना पत्र पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2 डिसेंबर 2016 रोजी एमएमआरडीएच्या 2417 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. 160 चौ. फुटांची दोन आणि 320 चौ. फुटाचे एक घर विजेत्यांना वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही घरे तयार असतानाही म्हाडाकडून विजेत्यांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया राबवली जात नव्हती. त्यामुळे घरांचा ताबा लांबणार होता. ही बाब लक्षात घेत गिरणी कामगार कल्याणकारी संघ आणि गिरणी कामगार संघर्ष समितीने ताबा देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती.

'मुंबई लाइव्ह'ने म्हाडाच्या या उदासीन धोरणासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आता लॉटरी लागलेल्या विजेत्यांना सूचना पत्र पाठवत कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. त्यानुसार 5 ऑगस्टपर्यंत विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.हे देखील वाचा - 

म्हाडाच्या लॉटरीचा मार्ग लवकरच मोकळा


संबंधित विषय
ताज्या बातम्या