म्हाडाच्या लॉटरीचा मार्ग लवकरच मोकळा

  Mumbai
  म्हाडाच्या लॉटरीचा मार्ग लवकरच मोकळा
  मुंबई  -  

  म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2017 ची गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेली लॉटरी आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण या लॉटरीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या घरांच्या 23 प्रकल्पांच्या नोंदणीची प्रक्रिया मुंबई मंडळाने पूर्ण केली असून, यातील 13 प्रकल्पांचे नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे. उर्वरित प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यास लॉटरी काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.


  हेही वाचा - 

  मुंबईकरांसाठी बंपर लॉटरी

  मास्टरलिस्टमधील 159 घरे मुंबईच्या लाॅटरीत!


  मुंबई मंडळाकडे घरे नसल्याने याआधी लॉटरी अडकली होती. तर पुरेशी घरे शोधून काढल्यानंतर खासगीसह सरकारी गृहप्रकल्पांना 'महारेरा' नोंदणी बंधनकारक झाली आणि पुन्हा लॉटरी अडकली. लॉटरी काढणे गरजेचे असल्याने म्हाडाने 'रेरा'त नोंदणी करताना सर्वप्रथम लॉटरीतील घरांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मुंबई मंडळाच्या 23 प्रकल्पांची नोंदणी करण्यास सर्वात आधी म्हाडाने सुरूवात केली आहे. या 23 प्रकल्पातील घरे लॉटरीमध्ये समाविष्ट असणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, म्हाडासह सरकारी प्रकल्पांचीही नोंदणी 'महारेरा'त झाल्याने आता म्हाडाच्या प्रकल्पाबाबत, घराबाबत कोणतीही तक्रार असल्यास लॉटरीतील विजेत्यांसह रहिवाशांना 'महारेरा'त दाद मागता येणार आहे. तर 'महारेरा'चा या प्रकल्पांवर वॉच असल्याने म्हाडालाही वेळेत प्रकल्प पूर्ण करणे, ताबा देणे आणि दर्जात्मक घरे देणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे ही बाब मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  इथे असतील लॉटरीतील घरे -

  चारकोप, तुंगा-पवई, सिद्धार्थनगर-गोरेगाव, महावीर नगर-कांदिवली, कन्नमवारनगर-विक्रोळी, गव्हाणपाडा-मुलुंड

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.