Advertisement

वरळी, बीडीडी चाळीच्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ


वरळी, बीडीडी चाळीच्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ
SHARES

वरळी, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या निविदाप्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याची चर्चा म्हाडात सुरू आहे.


दुसरी मुदतवाढ संपण्याआधीच...

परंतु, म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्याला नकार देत निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना काही तांत्रिक अडचणी असल्याने आणि कंपन्यांना मुदतवाढ हवी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

एप्रिलमध्ये वरळीतील पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाकडून निविदा मागवण्यात आल्या. पण या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दुसरी मुदतवाढ 17 जुलै रोजी संपणार होती. त्याचआधीच मुंबई मंडळाने निविदेला दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.


सर्वाधिक विरोध वरळीतूनच

त्यानुसार आता कंपन्यांना 27 जुलैपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे निविदेला मुदतवाढ देण्यात येत असल्याचे मुंबई मंडळाकडून सांगितले जात असले तरी कंपन्या या प्रकल्पासाठी पुढे येण्यास कचरत असल्याची चर्चा आहे.

कारण, वरळी सर्वाधिक इमारती असून वरळीतूनच सर्वात मोठा विरोध म्हाडाला आणि बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला होतो आहे. त्यामुळे बिल्डर निविदा सादर करण्यास पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे.

सध्या मंदीचे वातावरण असल्याने परिणामी निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी निविदेत अनेक अटी असल्याने या अटींमुळेही बिल्डर निविदा सादर करण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे 27 जुलैपर्यंत तरी निविदेला प्रतिसाद मिळेल की पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ मुंबई मंडळावर येईल, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.हे देखील वाचा - 

बीडीडी चाळीत म्हाडाची बॅनरबाजी!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा