Advertisement

बीडीडी चाळीत म्हाडाची बॅनरबाजी!


बीडीडी चाळीत म्हाडाची बॅनरबाजी!
SHARES

वर्षानुवर्षे रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ म्हाडाने थाटामाटात केला खरा, पण हा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी म्हाडाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या सर्व समस्या, मागण्या मार्गी लागल्याशिवाय प्रकल्पाची एकही वीट रचू न देण्याच्या निर्णयावर बीडीडीवासी ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यातच म्हाडा व्यस्त असल्याचे चित्र आहे.

यातून मार्ग काढत बीडीडीवासीयांना आकर्षित करण्यासाठी म्हाडाने एक अनोखा फंडा शोधून काढला आहे. नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या दोन ठिकाणच्या बीडीडी चाळींमध्ये म्हाडाने बॅनरबाजी सुरू केली आहे.घराची सविस्तर माहिती

हा प्रकल्प नेमका कसा असेल? त्यातील इमारती, घरे कशी असतील? घरांचे क्षेत्रफळ किती असेल? किचन कुठे असेल? बेडरुम कुठे असेल? अशी बारीकसारीक माहिती या बॅनरच्या माध्यमातून बीडीडीवासीयांपर्यंत पोहचवण्यासाठी म्हाडाने बॅनरबाजीचा घाट घातला आहे. शुक्रवारपासून सर्वत्र हे बॅनर झळकू लागले आहेत. बीडीडीवासीदेखील हे बॅनर न्याहळत भविष्यातील घर कसे असेल? याची स्वप्नं रंगवत आहेत.

दुसरीकडे म्हाडाने रहिवाशांसोबत चर्चेचा धडाकाही लावला आहे. नवनियुक्त उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर यांनी गुरुवारी बीडीडी चाळीतील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्या एेकून घेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


बैठक अन् बुकलेट!

शुक्रवारी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी नायगावमध्ये बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती रहिवाशांपर्यंत नव्याने पोहोचवली. महत्त्वाचे म्हणजे बॅनरबाजीसह प्रकल्पाची माहिती प्रत्येक घरात पोहोचावी म्हणून म्हाडाने बुकलेटही छापली आहेत.

अशा दीड ते 2 हजार बुकलेटचे वाटपही नायगाव आणि ना. म. जोशी परिसरात केल्याचे मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले. दरम्यान, शनिवारी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करत म्हाडाने प्रकल्पाची माहिती बीडीडीतील रहिवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.


जोपर्यंत बीडीडीतील रहिवाशांची संमती घेतली जात नाही, काॅपर्स फंड वाढवला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे म्हाडाने कितीही बॅनरबाजी केली, तरी त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या, तरच आम्ही पुनर्विकास मार्गी लावू देऊ. अन्यथा पुनर्विकासाची एक वीटही रचू देणार नाही.


- किरण माने, सदस्य, अखिल बीडीडी चाळ एकत्रित संघदुसरे घर नसावे आणि 1996 च्या आधीच्या पुराव्याच्या जाचक अटी म्हाडाने दूर केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध करण्याचे कारण नाही. म्हाडाच्या या बॅनरमुळे रहिवाशांना आपले घर कसे असेल? हे समजत आहे. रहिवासी खूश असून लवकरात लवकर प्रकल्प मार्गी लावावा, अशीच त्यांची भावना आहे. प्रकल्पाला काही लोकांचा विरोध आहे. प्रत्येक प्रकल्पात असा विरोध असतोच. पण या विरोधाचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही.


- कृष्णकांत नलगे, सरचिटणीस, बीडीडी चाळ उपक्रम सेवा समिती
हे देखील वाचा -

बीडीडी चाळधारकांचे आधी बायोमेट्रिक, मगच करार - वायकर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा