Advertisement

`सागरी सुरक्षेसाठी 'या' नीतीचा अवलंब करण्यात देशाचे हित'


`सागरी सुरक्षेसाठी 'या' नीतीचा अवलंब करण्यात देशाचे हित'
SHARES

सागरी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नीती अवलंबणे, हेच देशाच्या हिताचे आहे. त्या अनुषंगाने कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर विस्तीर्ण पसरलेल्या सागरी सुरक्षेची जबाबदारी केवळ नौदल, तटरक्षक दल यांच्यावरच अवलंबून नाही, तर प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून सागरी सीमेचे आपापल्या परीने रक्षण केले पाहिजे, युवाशक्तीचाही यात सहभाग असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.



चर्चासत्रात कोण कोण होते उपस्थित

भारताची सागरी सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब असून भविष्यातील राष्ट्रीय धोका टाळण्यासाठी त्या अनुषंगाने साधकबाधक चर्चा करून कृतीबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात अनेक मान्यवर, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नौदल प्रबळ करण्याचा विचार सावरकरांनी सर्वप्रथम केला

पूर्वीच्या काळातील समुद्रबंदीमुळे नौदल तयार झाले नाही. त्याचा फायदा इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी घेतला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदल आरमार स्थापन केले. त्यानंतरही नौदल प्रबळ करण्याचा विचार सावरकरांनी सर्वप्रथम केला. अंदमान हे तिन्ही संरक्षण दलाचे बलशाली तळ होऊ शकतात, त्याचबरोबर सेना, सैन्यबळ व प्रशिक्षण हेही त्या अनुषंगाने प्रभावी असावे, असे त्यांचे विचार होते. त्या विचारांनुसार सागरी सुरक्षेबाबत येणाऱ्या काळात देखील अधिक परिणामकारक कार्य झाले पाहिजे, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मांडले.

निवृ्त्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी अच्छे दिन येण्यासाठी सागरी सुरक्षेबाबत सुरक्षा दलातील विचारवंतांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी आणि तसे झाले तर सागरी सुरक्षेला अच्छे दिन येणारच, असा विश्वास व्यक्त केला.



हेही वाचा - 

मुंबईची सुरक्षा रामभरोसे - दामोदर तांडेल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा