Advertisement

मंत्रालयीन अधिकारी विकीपीडियावर मराठीत लिहिणार

मराठीतील जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचावी आणि आपली मायबोली वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. मराठी भाषा विभागानं मंत्रालयातून याची सुरुवात केली असून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी माहिती विकिपीडियावर मराठी माहिती कशी नोंदवावी, यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे.

मंत्रालयीन अधिकारी विकीपीडियावर मराठीत लिहिणार
SHARES

आजकाल कोणत्याही माहितीसाठी विकिपीडिया सर्रास वापरलं जातं. मात्र या संकेतस्थळावर अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेमधील माहिती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीतील जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचावी आणि आपली मायबोली वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. मराठी भाषा विभागानं मंत्रालयातून याची सुरुवात केली असून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी माहिती विकिपीडियावर मराठी माहिती कशी नोंदवावी, यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे.


यासाठी घेणार कार्यशाळा

नेटकऱ्यांसाठी 'विकीपीडिया' ही माहिती मिळवण्याची हक्काची जागा बनली आहे. पण, बऱ्याचदा 'विकीपीडिया'वरील माहिती इंग्रजीमध्ये तसेच, संदिग्ध असल्यानं प्रत्येकवेळी हवी ती माहिती मिळतेच असं नाही. त्यात 'विकीपीडिया'वर मराठीमध्ये फारशी माहिती उपलब्ध नसल्यानं अनेकांना अडचण येतं. ती उपलब्ध होण्यासाठी त्यावर अधिकाधिक माहिती अपलोड होणं आवश्यक आहे. मराठी विकीपीडियावर आपलं खातं उघडून आपण आपल्याकडं असलेली माहिती यामध्ये समाविष्ठ करू शकतो. मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडं मराठीतील माहिती असून ते त्यावर लिखाणही करतात. ही माहिती आणखी लोकांपर्यंत पोहचावी या हेतूनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन मराठी भाषा विभागाकडून करण्यात आलं आहे.


मराठी भाषेतील खुला ज्ञानकोश अधिक समृद्ध होणार

या सर्व अभियानासाठी मराठी विकीपीडियाचंही सहकार्य घेण्यात आलं असून सामान्यांना नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी, या उद्देशाने मराठी विकीपीडियातर्फे विशेष प्रयत्न केलं जाणार आहे. सध्या मराठी विकीपीडियावर ४५ हजारहून अधिक लेख आहेत. यामुळे मराठी विकीपीडियावरील लेखक संख्या वाढणार असून मराठी भाषेतील हा खुला ज्ञानकोश अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचं मत काही मराठीप्रेमींनी केलं आहे. यामुळे मराठी विकीपीडियाचं संकेतस्थळ केवळ इंग्रजीतील अनुवादित माहितीवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर स्थानिक आणि नवी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा