Advertisement

कांदिवली ते अंधेरीदरम्यान रविवारी बत्ती गुल!

२६ जानेवारीच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कांदिवली ते अंधेरीदरम्यानच्या काही परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचं एमएमआरडीएनं गुरूवारी जाहीर केलं आहे.

कांदिवली ते अंधेरीदरम्यान रविवारी बत्ती गुल!
SHARES

दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो-अ चं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून वेगात सुरू आहे. या कामांतर्गत २७ जानेवारीच्या रात्री उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या विस्ताराचं काम टाटा पावर कंपनीकडून करण्यात  येणार आहे. त्यामुळे २६ जानेवारीच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कांदिवली ते अंधेरीदरम्यानच्या काही परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचं एमएमआरडीएनं गुरूवारी जाहीर केलं आहे. 


नागरिकांनी मदत करण्याचं आवाहन

या कामादरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेत या कामासाठी टाटा पावर आणि एमएमआरडीएला मदत करावी असं आवाहनही केलं आहे. टाटा पावर कंपनीच्या उन्नत उच्च विद्युत वाहिनी (११० केव्ही मार्ग) मध्ये टाॅवर नंबर ४१ आणि ४२ चे मोनोपोलमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठीच काम मालाड पश्चिम इथं २६ जानेवारीच्या रात्री ११ वाजल्यापासून २७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. परिणामी कांदिवली पश्चिम, मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम आणि अंधेरी परिसरातील काही परिसरातील विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होईल असं एमएमआरडीएनं सांगितलं आहे.


हेही वाचा -

घाटकोपर विमान दुर्घटनाप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महारेराचा कांबार बिल्डरला दणका, पहिल्यांदाच होणार बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा