घाटकोपर विमान दुर्घटनाप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनीच घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार पोलिसांनी विमान दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपर विमान दुर्घटनाप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
SHARES

घाटकोपर विमान दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर विमान दुर्घटनेत विमानाच्या सहवैमानिक कॅप्टन मारिया झुबेरी यांचा मृत्यू झाला होतामारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनीच घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यु. वाय. एव्हिएशन कंपनीचे दीपक कोठारी, अनिल चौहान, विनोद साई आणि इतर संबंधित अधिकारी, स्पेअर पार्ट पुरवणारा सप्लायर अजय अग्रवालइंदमार एव्हिएशन कंपनीचे राजीव गुप्ताअविनाश भारती यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

निष्काळजीपणाचा कंपनीवर आरोप

यु. वाय. एव्हिएशन या खासगी विमान कंपनीचे विमान २८ जून २०१८ रोजी घाटकोपरमधील जीवदया गल्लीत कोसळले होते. यात वैमानिकासह त्याचे तीन सहकारी आणि एक पादचारी अशा ५ जणांचा मृत्यू झाला होता.  किंग एअर सी ९० या प्रकारातील १२ आसनी अशा या विमानाची देखरेख आणि दुरुस्ती करणाऱ्या इंदमार या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला होता. अपघातील विमानाची देखरेख इंदमार कंपनी करत होती. त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका बसल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाल्याचं कथुरिया म्हणाले.

कंपनीविरोधात कारवाईची मागणी

घाटकोपरविमान दुर्घटनेप्रकरणी कंपनीविरोधात कारवाई करावी. यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातलगांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी भा. दं. वि. कलम ३०४ (), ३३६, ३३७, ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा