Advertisement

एमएमआरडीएची अग्निशमन सेवा, या परिसरात पुरवणार सुविधा

मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसरासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झालेली आहे.

एमएमआरडीएची अग्निशमन सेवा, या परिसरात पुरवणार सुविधा
SHARES

मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसरासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानुसार, या परिसरामध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून अग्निशमन सेवा पुरवली जाणार आहे. भिवंडी तालुक्यातील ६१ गावं, कल्याणच्या ग्रामीण पट्ट्यातील १० गावं, अंबरनाथ - बदलापूर व सभोवतालचं अधिसूचित क्षेत्र अशा परिसरात ही सुविधा पुरवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेर जिथं एमएमआरडीएची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली आहे त्या भागात अग्निशमन सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ आणि ३१ आॅगस्ट, २००९ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या परिक्षेत्रात अग्निशमन सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, या आदेशाला जवळपास ११ वर्षे लोटली तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) आपल्या परिक्षेत्रात अशी सेवा सुरू केली नव्हती.

भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ येथील गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएची नियुक्ती झाली होती. मात्र, या भागाकडं दुर्लक्ष झालं होतं. परंतु, आता अग्निशमन दलापाठोपाठ या भागातील विकासावरही एमएमआरडीएनं लक्ष केंद्रित करावं, अशी स्थानिकांची मागणी आहे. प्राधिकरणामध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.

जलद प्रतिसाद प्रणालीसाठी १५ क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल्स आणि १५ बीट अग्निशमन केंद्रांची उभारणी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे २४ कोटी ७० लाख रुपये खर्च करावे लागणार असल्याचा एमएमआरडीएचा अंदाज आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: परदेशातून आलेल्या पश्चिम रेल्वेच्या २ चालकांचं विलगीकरण

Coronavirus Updates: शासकीय कार्यालयांसह शाळा-कॉलेजांमध्येही ५० टक्के उपस्थिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा