Advertisement

एमएमआरडीएची मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी


एमएमआरडीएची मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी
SHARES

मुंबई, ठाणे आणि रायगडसह मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) काम पाहत आहे. येथील पायाभूत सेवा- सुविधा उभ्या करतानाच त्या अद्ययावत करण्याचं कामही प्राधिकरणाकडून केलं जात आहे. अशातच एमएमआरडीएनं मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. तसंच, इथं प्रत्यक्षात सेवा देण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या परिसरातील आपत्कालीन घटनांवर तातडीनं नियंत्रण मिळविण्यात यश मिळणार आहे.

एमएमआरडीएच्या या सेवेमुळं येथील उर्वरित सेवांवरील ताण कमी होणार असून, प्राधिकरणाच्या अग्निशमन सेवेला संबंधित सेवांची मदत मिळणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बैठकांवर जोर दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे. एमएमआरडीएच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी दिल्याचं समजतं.

मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रस्ताव दाखल झाला असून, या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. पुढील बैठकीत पुन्हा हा विषय येईल. त्यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते.

नवी मुंबई, ठाण्यासह लगतच्या कल्याण-डोंबिवलीसह लगतच्या परिसरात आगी लागण्यासह आपत्कालीन घटना घडतात त्यावेळी मुंबई अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. याता ही यंत्रणा आणखी बळकट होणार असल्याचा दावा केला जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा