Advertisement

वाहतूक कोंडी सुटणार, मेट्रो प्रकल्पाच्या 6 ठिकाणांवरील बॅरिकेड्स हटवले

84 किलोमीटरचे बॅरिकेड्स हटवण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

वाहतूक कोंडी सुटणार, मेट्रो प्रकल्पाच्या 6 ठिकाणांवरील बॅरिकेड्स हटवले
SHARES

मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणांवरील 84 किलोमीटरचे बॅरिकेड्स हटवण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमधून अनावश्यक बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.

"पावसाळ्याच्या कालावधीत बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडी होऊ नये असा या निर्णयामागील उद्दिष्ट आहे. एकूण 33,922 बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत, परिणामी 84.806 किलोमीटर (42 किमी वन-वे) दुतर्फा रस्ता रहदारीसाठी अधिक खुला झाला आहे,” अधिकृत प्रेस निवेदनात म्हटले आहे.

मुंबईकरांची प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ने मुंबईत सुमारे 14 मेट्रो मार्ग विकसित करण्याची योजना आखली आहे. या मेट्रोचे जाळे अपग्रेड झाल्यानंतर उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी होऊन मुंबईकरांना सुखकर होण्यास मदत होईल.

मात्र या मेट्रो प्रकल्पांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. याचपार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

6 मेट्रो प्रकल्पातील एकुण 33, 922 बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा 84.806 (४२ किमी एकेरी रस्ता) किमी. लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 337 किमी लांब मेट्रोचं जाळं प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग 2ब, 4, 4अ, 5,6, 7अ आणि 9 या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स पैकी सुमारे 60 टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 1-1 मार्गिका वाहतूकीसाठी सुरु करण्यात आली आहे. 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा