Advertisement

शहाड स्टेशनजवळ रेल्वे उड्डाणपुलाचा विस्तार होणार

या रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी 320 कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

शहाड स्टेशनजवळ रेल्वे उड्डाणपुलाचा विस्तार होणार
SHARES

एमएमआरडीए (MMRDA) तर्फे कल्याण (kalyan)-अहिल्यानगर मार्गावरील शहाड (shahad) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी 320 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. सध्या दुपदरी असलेला उड्डाणपूल चौपदरी होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

अहिल्यानगर आणि परिसराला अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरून कल्याण आणि उल्हासनगरला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल (railway flyover) हा महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्थानकातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी 30 मीटर आहे.

तसेच उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची रुंदी 36 मीटर आहे. गेल्या काही वर्षांत या उड्डाणपुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतुककोंडीमुळे या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता चौपदरी करणे आवश्यक आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच एमएमआरडीएने निविदा काढल्या आहेत. निवडणुकीनंतर हे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय, आम्ही कल्याण ते विठ्ठलवाडी असा नवीन पूल बांधणार आहोत जो जुना पुणे लिंक रोड, कल्याण-बदलापूर महामार्ग आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्गाला जोडेल. हा पूल कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत रेल्वे लाईन ओलांडून कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या अडीच किमी अंतरासाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल,” असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात जलद रस्ते वाहतूक पायाभूत सुविधांची मागणी करत आहेत. कल्याण मतदारसंघात सध्या सुरू असलेले हजारो कोटींचे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मेट्रो, रस्ते, पूल, उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण, रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण आदींमुळे वाहतूक गतिमान होण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमांचे स्वागत करताना उल्हासनगरचे रहिवासी निशांत शिरसाट म्हणाले, “शहाड रेल्वे स्थानक उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे केवळ वाहतूक सुरळीत होणार नाही तर इंधनाचा वापर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल. सध्याचा उड्डाणपूल अतिशय अरुंद असल्याने वाहने चालवणे अवघड आहे. कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी हा विस्तार महत्त्वाचा ठरेल.”



हेही वाचा

उमेदवारीवरून राजकीय पक्षांतर्गत तू-तू, मै-मै

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा